उल्हासनगर (प्रतिनिधी): येथीलशहरामध्ये दिवसेंदिवसवाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर नागरिकांना भेडसावत आहे. उल्हासनगर शहरातील पादचाऱ्याकरिता बांधण्यात आलेल्या पदपथांवरव्यापारी आणि फेरीवाले यांनीअवैधरित्या कब्जा केल्याने पादचारी पदपथ हटविल्याप्रमाणे झाले आहेत. उल्हासनगर हे विशेष म्हणजे व्यापाऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. दर दहा वर्षांनी शहराचा विकास आराखडा तयार करण्याची तरतूद गेली ४० वर्षे शहराचा विकास आराखडाच तयार करण्यात आला नव्हता, परंतु आता कुठे मोठ्या प्रयत्नांती सर्वपक्षीय संमतीने शहर विकास आराखडा तयार करून उमपाने राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठविला आहे. परंतु शहर विकास आराखडा मंजूर होऊन शहराचा विकास होईल तेव्हा होईल पण आता शहरांमध्ये जिथे तिथे फक्त ४० ते ६० फुटांचे दुतर्फा रस्ते आहेत. तिथे दोन्ही रस्त्याच्या बाजुला वाहनांची पार्किंग, व्यापाऱ्यांचे विक्रीचे सामान यामुळे दुतर्फी अर्धा रस्ता व्यापलेला असतो. विशेष म्हणजे उल्हासनगर-२ येथील शिवाजी चौक ते नेहरू चौक रस्ता तेथे फर्निचर मार्केट असून तेथे तर व्यापाऱ्यांच्या स्वतःच्या वापराच्या गाड्या तसेच माल वाहून नेण्याकरिता उभ्या असलेल्या गाड्या यांनी रस्ता अर्धा व्यापला जातो.तिच परिस्थिती उल्हासनगर कॅम्पनं.४ येथील व्हीनसचौक ते ओ.टी.सेक्शनचौक, उल्हासनगर-५ येथील कैलाश कॉलनी ते हिललाईन येथे सुध्दा पहावयास मिळते. तर पदपथावरील विक्रीचे सामान ठेवल्यामुळे पदपथ पादचाऱ्यांकरिता उपयोगात येत नाही. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांमुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या इतर प्रवासी वाहनांनाही कोंडीचा सामना करावा लागतो.
वाहतूककोंडीने त्रस्त उल्हासनगरमधील नागरिक